#KishoriPednekar #Shivsena #ManishaKayande #MaharashtraTimes<br />महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र आल्याने मुंबईत सध्या खळबळ माजली आहे. संबंधित पत्रात अश्लील भाषेचा वापर करण्यात आला आहे.सर्व प्रकरणाला राजकीय रंग असल्याचं म्हटलं जात आहे. शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी देखील या प्रकरणात उडी घेतली.महापौरांना अशा पद्धतीचं पत्र येणं दुर्देवी असल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.